Dark Underarms : अंडरआर्म्सवरील काळेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ खास घरगुती उपाय फायदेशीर!
आपण चेहरा, हात आणि पाय यांची खूप काळजी घेतो. मात्र, अंडरआर्म्सकडे दुर्लक्ष करतो. अंडरआर्म्सची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. यामुळे नेहमीच अंडरआर्म्सची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय केले पाहिजे. अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू, बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे.
1 / 5

2 / 5
जवळजवळ प्रत्येक घरात आढळणारा बेकिंग सोडा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यास मदत करतो. यासाठी आवश्यकतेनुसार बेकिंग सोडा घ्या. त्यात पाणी घाला. आता ही पेस्ट आठवड्यातून दोनदा अंडरआर्म्सवर लावा. स्क्रबिंग केल्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
3 / 5
केस आणि त्वचेसाठी खोबरेल तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या त्वचेचा काळेपणा नैसर्गिकरित्या दूर होण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन ई असते. नारळाच्या तेलाने दररोज अंडरआर्म्सची मालिश करा.
4 / 5
ऑलिव्ह ऑइलचा वापर नेहमीच सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. एक चमचा ऑलिव्ह ऑईल एक चमचे ब्राऊन शुगरमध्ये मिसळा. एक्सफोलिएटर म्हणून वापरा. दोन मिनिटे ते स्क्रब करा आणि नंतर काही मिनिटे सोडा. आता पाण्याने धुवा.
5 / 5
लिंबू हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानले जाते. अंघोळीपूर्वी अर्धे लिंबू रोज अंडरआर्म्सवर लावा. दोन-तीन मिनिटे चोळा म्हणजे काळेपणा दूर होण्यास मदत होईल. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)