Hair Care : हिवाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती हेअर मास्क वापरून पाहा!
दूध आणि मधाचा खास मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक कप कच्चे दूध आणि एक चमचा मध लागेल. दूध आणि मध चांगले मिक्स करा आणि टाळूची मालिश करा. त्यानंतर 30 मिनिटे तसेच केसांवर हा मास्क राहूद्या. नंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. अंड्यातील पिवळ बलक, मध आणि ऑलिव्ह ऑईल मास्क आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे
1 / 5
दूध आणि मधाचा खास मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक कप कच्चे दूध आणि एक चमचा मध लागेल. दूध आणि मध चांगले मिक्स करा आणि टाळूची मालिश करा. त्यानंतर 30 मिनिटे तसेच केसांवर हा मास्क राहूद्या. नंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
2 / 5
अंड्यातील पिवळ बलक, मध आणि ऑलिव्ह ऑईल मास्क आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. एका अंड्यातील पिवळ बलक, एक कप मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. आता हे मिश्रण तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
3 / 5
दही, लिंबू आणि अॅपल सायडर व्हिनेगरचा मास्क केसांना लावल्याने अनेक फायदे होतात. दोन चमचे दही, एक चमचा लिंबू आणि एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एकत्र मिसळा. नंतर हे मिश्रण तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा आणि 30 मिनिटे राहू द्या.
4 / 5
दही आणि केळ्याचा मास्क लावल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. एक पिकलेली केळी, अर्धा कप दही आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. सर्व घटक चांगले मिसळा आणि टाळूसह सर्व केसांना लावा. 45 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
5 / 5
नारळ तेल, अॅपल व्हिनेगर आणि मध मास्क तयार करण्यासाठी सुरूवातीला दोन चमचे खोबरेल तेल आणि मध घ्या. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण केसांसह टाळूला लावा. वीस मिनिटे ठेवा आणि केस कोमट पाण्याने धुवा. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)