Yoga asanas : डबल चिनची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने फायदेशीर !
चक्रासन हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
1 / 5
चतुरंग दंडासनसाठी अर्ध्या पुश अपमध्ये आपल्या शरीराची स्थिती घ्या. दोनही हात समान ठेवा. या आसनात 10-15 सेकंद रहा. हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
2 / 5
अर्ध पिंच मयूरासन- आपले कोपर आणि तळवे जमिनीवर ठेवा. खांदे वर करा आणि आपले बोट पुढे करा. आपले पाय सरळ ठेवून, आपले बोट आपल्या कोपरांकडे वळवा. शक्य तितका वेळ या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
3 / 5
चक्रासन हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
4 / 5
बालासन - हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून, पायाची बोटं स्पर्श करून, आणि टाच बाहेरच्या दिशेने बोटांवर बसा. आपले हात आणि कंबर पुढे वाकवा. हळूवारपणे आपले कपाळ जमिनीवर ठेवा किंवा आपले डोके एका बाजूला वळवा. या आसनामध्ये पाच मिनिटे स्थिर राहा.
5 / 5
मार्जरीआसन - हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. खांदे आणि मानेवरील ताण कमी होतो. हे आसन करण्यासाठी आपले हात आणि गुडघे जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि पाच मिनिटांसाठी आसन स्थितीमध्ये स्थिर राहा.