गरम खाद्यपदार्थ नेहमी खाल्ले पाहिजेत . गरम आणि ताजे शिजवलेले अन्न शरीर सहज पचवते. थंड अन्न किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न तुमची पचनशक्ती कमी करू शकते. यामुळे पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जेवण आणि नाश्ता भूक लागल्यावरच खा. निरोगी वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या भुकेच्या पातळीनुसार अन्न खा. यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होईल.