Avocado Face Pack : अॅवकाडोचे ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अॅवकाडो वापरू शकता. यात जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि के, रायबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ल्यूटिन, बीटा-कॅरोटीन, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् तसेच अँटी-एजिंग अँटीऑक्सिडंट्स यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
1 / 5
कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अॅवकाडो वापरू शकता. यात जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि के, रायबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ल्यूटिन, बीटा-कॅरोटीन, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् तसेच अँटी-एजिंग अँटीऑक्सिडंट्स यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अॅवकाडोमुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
2 / 5
अॅवकाडो घ्या त्याचा लगदा बाहेर काढा आणि मॅश करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. त्वचेवर 20-30 मिनिटे तसेच सोडा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे वापरू शकता. यामुळे आपल्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
3 / 5
तीन चमचे अॅवकाडो लगदा घ्या आणि त्याला चांगले मॅश करून घ्या. गुळगुळीत पेस्ट बनवा. त्यात एक चमचा नारळ तेल मिसळा आणि हे मिश्रण सर्व चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हळूवारपणे मालिश करा. 20-30 मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
4 / 5
चार चमचे अॅवकाडोची पेस्ट घ्या आणि त्यामध्ये तीन चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. आपल्या बोटाने हळूवारपणे मालिश करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर ही पेस्ट ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
5 / 5
अॅवकाडोचा लगदा चार चमचे घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा आपल्या चेहऱ्याला लावू शकता.