तुमच्याही पायाच्या तळव्यात जळजळ होत आहे का? मग जाणून घ्या कारणे आणि उपाय!
जर आपल्याला ही हा त्रास होत असेल तर ही समस्या कायमची दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नक्की करायला हवेत. ज्यामुळे ही समस्या दू होईल. जे लोक दारूचे सेवन अतिप्रमाणात करतात, त्यांना प्रामुख्याने या त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी दारूचे सेवन बंद करणे हाच उपाय आहे. तळव्यात जळजळ काही लोकांना दारूचे सेवन न करताही होते.
1 / 10
पायांच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये पायातील रक्ताभिसरण खराब होणे, वय वाढणे, मधुमेह आणि रक्तदाब, व्हिटॅमिन सीची कमतरता अशा कारणांचा समावेश आहे.
2 / 10
बऱ्याच लोकांना हा त्रास प्रचंड होतो. यासाठी अनेकजण डाॅक्टरांशी संपर्क देखील करतात. मात्र, काही दिवसांनी तो त्रास परत सुरू होतो.
3 / 10
जर आपल्याला ही हा त्रास होत असेल तर ही समस्या कायमची दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नक्की करायला हवेत. ज्यामुळे ही समस्या दू होईल.
4 / 10
जे लोक दारूचे सेवन अतिप्रमाणात करतात, त्यांना प्रामुख्याने या त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी दारूचे सेवन बंद करणे हाच उपाय आहे.
5 / 10
तळव्यात जळजळ काही लोकांना दारूचे सेवन न करताही होते. अशावेळी या लोकांनी आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
6 / 10
बडीशेप शरीराचे तापमान सामान्य ठेवते. ब्लेंडरमध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा साखर घालून बारीक करा. आता ते पाण्यात विरघळवून प्या. यामुळे तळव्यातील जळजळ कमी होते.
7 / 10
तळव्यातील जळजळ कमी करण्यासाठी दुधी भोपळा देखील फायदेशीर ठरतो. तळव्यातील जळजळ सुरू झाली की, पायाच्या तळव्यावर दुधी भोपळा चोळा यामुळे आराम मिळेल.
8 / 10
जळजळ सुरू झाल्यास आपल्या पायांना मेंहदी लावा. यामुळे जळजळ कमी होऊन तळवे थंड होतात. तळव्यावर भिजवलेली मेंहदी लावा आणि काही वेळाने धुवा.
9 / 10
पायाच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे रक्ताभिसरण मंदावणे. ते अधिक चांगले करण्यासाठी, खोबरेल तेलाने तळवे मसाज करा.
10 / 10
काही लोकांना तळव्यामध्ये जळजळ नेहमीच असते. अशांनी दररोज सकाळी किमान वीस मिनिटे तरी चालले पाहिजे. तसेच डाॅक्टरांच्या सल्लाने पायांचे व्यायाम देखील करा.