Hair | पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती हेअर पॅक वापरून पाहा!
केसांना रंग देण्यासाठी मेंहदी हे नैसर्गिक उत्पादन आहे. केस काळे करण्यासाठी मेंहदीमध्ये कॉफी पावडरही मिसळा. काही वेळ झाकून ठेवल्यानंतर त्यात हेअर ऑइल मिक्स करून केसांना लावा. 2 ते 3 तासांनी केस शॅम्पू करा. यामुळे केसांचा रंग काळा होण्यास मदत होते. केस काळे करायचे असतील तर बटाटा आणि दही हेअर पॅक फायदेशीर ठरतो. बटाटे एका भांड्यात उकळा. हे पाणी थंड करून त्यात दोन चमचे दही घाला. आता ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर शॅम्पूने स्वच्छ करा.