उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्वचेची ऍलर्जी, पुरळ, ब्लॅकहेड्स, सनबर्न आणि बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचा नियमित स्वच्छ ठेवा. तसेच थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.
उष्ण हवामानात घाम येणे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
ब्रिटीश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ऋतूतील बदलांचा सेल्युलर स्तरावर त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळा येताच तुमची त्वचा कशी बदलते हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे नियमित आंघोळ करा आणि जास्तीत-जास्त पाणी प्या.