PHOTO : सूर्याच्या कडक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी खास टिप्स !
सूर्याच्या कडक किरणांमुळे आपल्या केसांवर आणि त्वचेवर परिणाम होतो. यामुळे आपले केस कोरडे आणि बेजान होतात. सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते, परंतु केसांचे संरक्षण करणे तितके सोपे नाही.
1 / 5
सूर्याच्या कडक किरणांमुळे आपल्या केसांवर आणि त्वचेवर परिणाम होतो. यामुळे आपले केस कोरडे आणि बेजान होतात. सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते, परंतु केसांचे संरक्षण करणे तितके सोपे नाही. मात्र, काही घरगुती टिप्स फाॅलो करून आपण सूर्याच्या कडक किरणांपासून केसांचे संरक्षण करू शकतो.
2 / 5
शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. उन्हात बाहेर जाताना केस झाकून घ्या किंवा मोठी टोपी घाला. सुर्याचे किरण थेट आपल्या केसांवर पडणार नाहीत, याची काळजी घ्या.
3 / 5
आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसेच, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत. कंडिशनरमुळे आपल्या केसांचे सूर्याच्या किरणापासून संरक्षण होते.
4 / 5
कोरफड ही वनस्पती आपल्याला थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर केसांसाठी केला जातो. केसांना कोरफड लावल्यामुळे उन्हापासून केसांचे संरक्षण होते.
5 / 5
तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.