Travel Special : पर्यटनाला जाण्याचा विचार करताय, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर तुमच्यासाठी ठरेल भन्नाट पर्याय
ग्वाल्हेर शहराची निर्मिती राजा सूरजसेन यानं केली होती. ग्वाल्हेरमध्ये आजही ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतात. आकर्षक स्मारक, महाल, मंदिर ही पर्यटकांना आकर्षित करतात.
1 / 5
ग्वाल्हेर शहराची निर्मिती राजा सूरजसेन यानं केली होती. ग्वाल्हेरमध्ये आजही ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतात. आकर्षक स्मारक, महाल, मंदिर ही पर्यटकांना आकर्षित करतात. तर, ग्वाल्हेरमध्ये अशी अनेक टिकाण आहेत. मात्र, ग्वाल्हेरमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत.
2 / 5
ग्वाल्हेरमध्ये सासबहू मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराची निर्मिती 9 व्या शतकात करण्यात आली होती. मंदिराचं नाव जसं खास आहे त्याप्रमाणं याचं बांधकाम आणि स्थापत्यशैली पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराचं नाव देखील पर्यटकांसाठी कुतुहलाचा विषय ठरते.
3 / 5
ग्वाल्हेरमधील सिंधीया संग्रहालय हे एक पाहण्यासारखं ठिकाण आहे. हे संग्रहालय जिवाजी राव सिंधीया यांना समर्पित आहे. मध्यप्रदेशातील सर्वात प्रमुख संग्रहालय म्हणून याची ओळख आहे. 1964 मध्ये याची निर्मीती करण्यात आली होती. येथील नाणी, चित्र, शस्त्र मूर्ती पाहण्यासारखी आहेत.
4 / 5
ग्वाल्हेराचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची निर्मिती दोन भागात करण्यात आली आहे. किल्ल्याचं सुंदर रुप, विशालता याचं वर्णन शब्दामध्ये करणं कठिण असल्याचं सांगितलं जातं. या किल्ल्यात मन मंदिर, गुजरी महाल, पाण्याच्या टाक्या आहेत.
5 / 5
तेली मंदिर हे देखील ग्वाल्हेरमधील पाहण्यासारखं ठिकाण आहे. याची निर्मिती 9 व्या शतकात झालीय. ग्वाल्हेरमधील सर्वात मोठी इमारत म्हणून याची ओळख आहे. याची उंची 100 फुट आहे. येथील वास्तूकला पाहण्यासारखी आहे.