केळीच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्वं असतात. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वं बी, सी आणि ई आहे. हे त्वचे संबंधित समस्या दूर करण्यात मदत करतं. चमकदार त्वचेसाठी केळीचे साल कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
केळीच्या साल
मऊ त्वचेसाठी केळीची साल बारीक करून त्यात मध घाला. ही पेस्ट थोडावेळ चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा कोमल बनण्यास मदत होईल.
सुरकुत्यांना दूर करण्यासाठी केळीची साल वापरली जाऊ शकते. यासाठी केळीच्या सालांची मिक्सरमध्ये पेस्ट करा. यानंतर त्यात मध आणि अंडी घाला. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्यावर लावा आणि कोरडं झाल्यावर चेहरा धुवा. यामुळे सुरकुत्यांची समस्या टाळण्यास मदत होईल.
सुंदर त्वचा