हिरड्यांमधले रक्त आणि दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

| Updated on: Feb 02, 2022 | 5:40 AM

Teeth's care in marathi:हिरड्यांमधून रक्त येण्यामुळे दातांमध्ये पायोरियाची समस्या उद्भवू शकते. दातांची आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे दातांचा पिवळेपणा ही आहे. मात्र या दोनही समस्या आपण काही सोप्या घरगुती उपयांनी देखील दूर करू शकतो. अशाच काही उपयांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

1 / 5
हळद : हळद हा संसर्गजन्य रोग बरा करण्यासाठीचा एक हर्बल उपाय आहे. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे हिरड्यांची जळजळ दूर करण्यासाठी मदत करतात. दातांच्या प्रभावित भागावर हळद लावावी आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. असे केल्यास तुम्हाला हिरड्यांच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

2 / 5
त्रिफळा : त्रिफळा चूर्ण हे अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार करण्यात येते. त्रिफळा चूर्णामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. हिरड्यांचे आजार बरे करण्यासाठी त्रिफळा चूर्ण हे एक प्रभावी औधष आहे. रोज एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन ते पाण्यात भिजून त्याचा लेप दातांच्या प्रभावित भागाला लावावा, त्यानंतर थोड्यावेळाने हा लेप व्यवस्थित स्वच्छ धुऊन टाकावा. असे केल्यास तुम्हाला दातांच्या अनेक समस्येमध्यून मुक्ती मिळते.

3 / 5
मुलेठी : मुलेठीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे मुलेठीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. मुलेठीच्या वापराने तोंडातील जीवाणू नष्ट होतात. मुलेठीच्या पावडरने नियमित ब्रश केल्यास हिरड्यांमधून होणार रक्तस्त्राव बंद होतो. तसेच तोंडातील किरकोळ जखमा बऱ्या होतात. सोबतच दातांचा पिवळेपणा दूर होण्यास देखील मदत होते.

4 / 5
लवंग तेल : हिरड्यांमधून रक्त येणे, दातदुखी, सूज आणि दातांमधून रक्त येणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लवंगाच्या तेलाची मदत घेऊ शकता. यामुळे तोंडातून येणारा दुर्गंधही दूर होऊ शकतो. यासाठी कापसाच्या तुकड्यांमध्ये तेल भिजवून प्रभावित भागावर लावावे.

5 / 5
पेरूची पाने : यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे दातांच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. पेरूची पाने आधी स्वच्छ धुवा, त्यानंतर ते पाने पिण्याच्या पाण्यामध्ये उकळवा. या पाण्याने गुळण्या केल्यास तोडांमधून येणारी दुर्गंधी दूर होते. तसेच दातांचा पिवळेपणाही दूर होतो. टिप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी देण्यात आले असून, कोणतेही औषधोपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.