Fashion Tips : 2021मध्ये ‘या’ हेअरस्टाइल होत्या महिलांमध्ये प्रिय…
2021मध्ये आपण फॅशन (Fashion) आणि सौंदर्या(Beauty)बाबत अनेक ट्रेंड पाहिले आहेत. यामध्ये अशा काही हेअरस्टाइल्स (Hairstyles) होत्या ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
1 / 5
2021मध्ये आपण फॅशन आणि सौंदर्याबाबत अनेक ट्रेंड पाहिले आहेत. यामध्ये अशा काही हेअरस्टाइल्स होत्या ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातल्याच काही हेअरस्टाइल्स पाहू या... हाफ बबल पोनीटेल - 2021मध्ये हाफ बबल पोनीटेल खूप ट्रेंडमध्ये होता. महिला कॅज्युअल पोशाखांसह ही केशभूषा करताना दिसल्या. हे करणं सोप्पय. नेहमीप्रमाणे अर्धी पोनीटेल बनवा. आता काही अंतरावर 3-4 रबर बँड लावा. आता तुमच्या केसांच्या स्ट्रैंड्स काढा. जेव्हा तुम्ही घाईत असता पण तरीही तुम्हाला स्टायलिश दिसायचं असतं तेव्हा ते बनवणं सोपं असतं.
2 / 5
हेअरबँड्स - वर्षाच्या सुरुवातीपासूनट हेअर बँड खूप लोकप्रिय झालाय. अनेक सेलिब्रिटीदेखील हेअर बँडमध्ये दिसले. हे हेअरबँड अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे हेअरबँड निवडू शकता. यासाठी तुमचे केस मोकळे सोडा आणि हेअरबँड लावा आणि तुमचा परफेक्ट लुक तयार होईल. हेअरबँड सर्वांचं लक्ष वेधून घेईल.
3 / 5
हाय पोनीटेल - या वर्षी ट्रेंडमध्ये आलेली आणखी एक हेअरस्टाइल म्हणजे हाय पोनीटेल. हाय पोनीटेल नेहमीच ट्रेंडमध्ये असते. ही केशरचना कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी योग्य आहे, मग ती प्रासंगिक असो वा औपचारिक. तुम्ही कोणत्याही पोशाखासोबत हे वापरून पाहू शकता आणि तुमचे केस फक्त एका मिनिटात तयार होतील.
4 / 5
स्पेस बन्स - या वर्षी स्पेस बन हेअरस्टाइलमध्येही लोक खूप दिसले. या हेअरस्टाइलमध्ये तुमचा लूक खूपच क्यूट दिसतो. यासाठी मध्यभागी विंचरून दोन बन्स बनवा.
5 / 5
बीच वेव्हज - ही केशरचना 2021मधल्या सर्वात ट्रेंडिंग केशरचनांपैकी एक आहे. तुम्ही ते तुमच्या इन्स्टा फीडमधून स्क्रोल करताना पाहिलं असेल. ही स्टाइल करणं सोपं आहे. तुम्ही ती कोणत्याही पोशाखासोबत करू शकता, मग ते कॅज्युअल, औपचारिक किंवा इतर. ही केशरचना साध्या पोशाखांबरोबरच ओव्हर टॉप आउटफिट्समध्येही करता येते.