Tourist Destinations | प्राचीन इतिहासपासून देवभूमीपर्यंत भारताचा डोळे दिपवणारा प्रवास, सुट्ट्यांमध्ये या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

| Updated on: Nov 03, 2021 | 9:14 AM

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही या दिवाळीत भेट देण्याचा विचार करू शकता. आम्ही तुमच्यासाठी भारतातील काही निवडक ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत.

1 / 5
गोकर्णचा शब्दश: अर्थ गायीचा कान. कर्नाटकातील गंगावली आणि अघनाशिनी नद्यांच्या संगमावर गोकर्ण आहे. सहज पाहता त्याचा आकार कानासारखा दिसतो. हा परिसर हिंदूंचे देवस्थान आहे. इथे अनेक छोटय़ा-छोटय़ा मंदिरांचा समूह आहे. अतिप्राचीन महाबळेश्वर मंदिरात शंकराच्या आत्मिलग स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक इथे येतात. हे आत्मिलग साक्षात शिवशंकराने रावणाला दिले होते, असा समज आहे.

2 / 5
भारतात अशा अनेक इमारती आणि शहरं आहेत, ज्यांमध्ये प्राचीन इतिहास आणि त्याचा सुवर्णकाळ दडला आहे. देशातील अनेक प्रसिद्ध इमारतींबाबत तसं अनेकांना माहीत आहेच. पण अजूनही एक अशी इमारत आहे ज्याबाबर फार जास्त लोकांना माहिती नाही. हे ठिकाण म्हणजे मांडू. पश्चिम मध्य प्रदेशातील मालवा क्षेत्रातील विंध्य डोंगरांमध्ये २ हजार फूट उंचीवर असलेले मांडू एक प्राचीन शहर आहे. या शहरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. आज मांडू देशातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण अजूनही फार लोकांना या ठिकाणाबाबत माहीत नाही. अजूनही ते हवं तितकं लोकप्रिय झालेलं नाही. या शहराला राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या अमर प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. मांडवी बीचमध्ये १९२९ मध्ये राव विजयराज जी यांनी विजय विलास पॅलेस बांधला होता. हे गुजरातमधील एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे,  येथे मुख्यतः राजपूत, मोगल आणि व्हिक्टोरियन अशा तीन स्थापत्य शैलींचे मिश्रण पाहायला मिळेल.

3 / 5
मिझोराम हे हिरव्यागार डोंगररांगांनी व्यापलेले आहे. राज्याचे सर्वात उंच शिखर फावांगपुई (७०७५ फूट) हे म्यानमारच्या सीमेवर आहे. या डोंगररांगेला ब्ल्यू माउंटन म्हणून ओळखले जाते. राज्याची भाषा मिझो असल्याने येथील लोकांशी संपर्क साधताना भाषेची थोडी अडचण येते. येथे बांबूची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असल्याने दैनंदिन गरजांसाठी बांबूचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे तेथे आपल्याला घरेही बांबूचीच पाहायला मिळतील. मिझो संस्कृतीतील दहा नृत्यप्रकारांपैकी चेराव म्हणजे बांबूनृत्य पर्यटकांसाठी पर्वणी असते. ऐजवालमधील झुलॉजिकल पार्क, म्युझियम प्रेक्षणीय आहे. तेथील बडा बाजार नावाची मुख्य बाजारपेठ प्रसिद्ध आहे. इथल्या हॉटेलांत चायनीजबरोबरच भात, भाकरी, वरण हमखास मिळते.

4 / 5
हिमालय पर्वताच्या कुशीत असलेले हिमाचल प्रदेश(himachal tourist places) हे राज्य भारतातील प्रमुख पर्यटन राज्यांपैकी एक आहे. ‘बर्फाळ पर्वतांचा प्रदेश’ असा अर्थ असलेले हिमाचल प्रदेश ‘देवभूमी’ म्हणून ही ओळखले जाते. हिमाचल प्रदेश हे भारताच्या उत्तरेकडील राज्य असून देश-विदेशातील पर्यटकांच्या आवडीचे राज्य आहे.उंच-उंच डोंगर दऱ्या,निसर्ग सौंदर्याने नटलेला भूप्रदेश,बर्फाच्छादित पर्वत शिखरे,फेसाळत वाहणाऱ्या नितळ पाण्याच्या नद्या अशा अनेक बाबी पर्यटकांना आकर्षित करून घेतात.२५ मी १९७१ रोजी भारताचे अठरावे राज्य म्हणून हिमाचल प्रदेश ची निर्मिती झाली.शिमला ही हिमाचला प्रदेश ची राजधानी आहे.हिमाचल प्रदेश च्या उत्तरेस जम्मू कश्मीर व लडाख हा केंद्रशासित प्रदेश,पश्चिम व दक्षिण पश्चिमेस पंजाब,दक्षिण दिशेला हरियाणा,दक्षिण-पूर्वेला उत्तराखंड,व पूर्वेस तिबेट चा भाग आहे. हिमाचल प्रदेश हे थंड हवामान असणारे राज्य असल्यामुळे या राज्यातील अन्न पदार्थ हे भारताच्या इतर राज्यापेक्षा काहीसे वेगळे आहेत.थंडीपासून वाचण्यासाठी व जास्त उर्जा मिळवण्यासाठी मांसाहाराचे सेवन केले जाते.परंतु जास्तीत जास्त लोक शाकाहाराला प्राधान्य देतात.विशेषतः मोसमी फळे व सेंद्रीय भाजीपाला यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

5 / 5
भारताच्या पश्चिमेकडे असलेले जैसलमेर ची स्थापना ई.स.११७८ च्या सुमारास  यादव वंशीय रावल-जैसल यांनी केली. स्वतंत्र भारताच्या गणराज्यात सामील होई पर्यंत ७७० वर्षे रावल-जैसल यांच्या वंशजांनी जैसलमेर इथे शासन केले.प्रारंभीच्या काळात मुघलांशी चांगले संबंध ठेवल्यामुळे खिलजी,तुघलक,राठोड अशा बाह्य आक्रमणांना परतवून लावले.मुघल,इंग्रज यांच्याशी सलोख्याचे संबंध असूनही जैसलमेर च्या वंशजांनी आपली संस्कृती,प्रतिष्ठा व मानसन्मान जपून ठेवला.इथे तुम्ही जैसलमेर किल्ला , पटवा हवेली, सलीम सिंग हवेली, डेझर्ट सफारी, कुलधारा गाव, भारत-पाक सीमा  या ठिकाणी भेट देऊ शकता.