महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात शिंदे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत पायी जात मतदानाचा हक्क बजावला आहे.
ठाकरे गटाते प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. मातोश्री शेजारील असलेल्या नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर मतदान ठाकरे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांचे सुपुत्र स्वयम राहुल शेवाळे यांचे हे पहिले मतदान असल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आलं.
भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी आणि मुलांसोबत किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांनी मलबार हिल येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.