पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवली चपाती, लंगरमध्ये लोकांना वाढले जेवण
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. देशभरात त्यांच्या प्रचार सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस बिहार दौऱ्यावर आले. रविवारी रात्री राजभवनात मुक्काम केला. त्यानंतर सोमवारी सकाळी पटनामधील गुरुद्वारा तख्त साहिब येथे पोहचले.
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शीखांचे दुसरे सर्वात मोठे तख्त आणि श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांचे जन्मस्थान गाठले. ते पगडी परिधान करुन गुरुद्वारात आले. त्यांनी दरबार साहिबमध्ये डोके टेकवले.
2 / 5
लंगरमधील प्रसाद घेतला. यावेळी त्यांनी लंगरसाठी सेवाही दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लंगरमध्ये पोळी बनली. लंगरमध्ये प्रसादासाठी बसलेल्या भाविकांना जेवणही वाढले. पंतप्रधान जवळपास 20 मिनिटे गुरुद्वारात होते.
3 / 5
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तख्त श्री हरमंदिर जी पटना साहिब गुरुद्वारात आल्यावर गुरुघरच्या प्रथेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांच्या आगमनासाठी व्यवस्थापन समितीकडून आगाऊ तयारी करण्यात आली होती.
4 / 5
तख्त श्री पटना साहिबला श्री हरमंदिर जी पटना साहिब असेही म्हटले जाते. हे पटणा येथे असलेल्या शिखांच्या पाच तख्तांपैकी एक आहे. तख्त 18 व्या शतकात महाराजा रणजित सिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मस्थानाला चिन्हांकित करण्यासाठी बांधले होते.
5 / 5
पंतप्रधान मोदींनी डोक्यावर पगडी घालून श्री हरमंदिर जी पटना साहिबला येथे आले. यासंदर्भात अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान खूप आनंदी दिसत आहेत.