माधुरी दीक्षित.. ॲपलचे टीम कूक अन् मुंबईचा वडापाव; भन्नाट कॉम्बिनेशन पाहून नेटकरी अवाक्!
त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'वडापाव फक्त स्वागतच नाही करत तर सर्वांचा आवडता होऊन जातो', असं एकाने लिहिलंय. तर 'आय वडा लवकरच लाँच होईल वाटतं', अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. या फोटोवरून काही भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.
1 / 6
ॲपल कंपनीचे सीईओ टिम कूक नुकतेच भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (18 एप्रिल) ते मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये देशातील पहिला ॲपल स्टोअर लाँच करणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने टिम कूक यांचं मुंबईत स्वागत केलं.
2 / 6
विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच टिम कूक यांनी मुंबईच्या वडापावची चव चाखली. माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर टिम यांनीसुद्धा त्यांच्या अकाऊंटवर तो शेअर केला. या फोटोमध्ये टिम कूक हे माधुरीसोबत वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
3 / 6
मुंबईचा वडापाव हा जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे एखादी परदेशी व्यक्ती पहिल्यांदा मुंबईत आली, तर तिला वडापावची चव आवर्जून चाखवली जाते. मुंबईकर असलेल्या माधुरीने टिम कूक यांच्यासोबत वडापावचा आस्वाद घेतला. 'वडापावपेक्षा चांगलं स्वागत मुंबईत असूच शकत नाही', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
4 / 6
त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'वडापाव फक्त स्वागतच नाही करत तर सर्वांचा आवडता होऊन जातो', असं एकाने लिहिलंय. तर 'आय वडा लवकरच लाँच होईल वाटतं', अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. या फोटोवरून काही भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.
5 / 6
असंख्य मुंबईकरांप्रमाणेच टिम कूक यांनासुद्धा वडापाव खूप आवडला. माधुरीने पोस्ट केलेला फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, 'धन्यवाद माधुरी दीक्षित.. मला माझ्या सर्वांत पहिल्या वडापावची ओळख करून दिल्याबद्दल.. ते खूपच चविष्ट होतं.'
6 / 6
भारत दौऱ्यावर असलेले टिम कूक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप-आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेणार आहेत. सोमवारी दुपारी त्यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरही पाहिलं गेलं.