सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते? माधुरी दीक्षितच्या पतीने क्रेव्हिंग्ससाठी सांगितला अत्यंत सोपा उपाय
सतत काहीतरी अरबट-चरबट खाण्याची इच्छा होत असेल तर त्याला क्रेव्हिंग्स असं म्हणतात. या सवयीचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. याच क्रेव्हिंग्सवर नियंत्रण आणण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सर्वांत सोपा उपाय सांगितला आहे.
1 / 5
अनेकांची तक्रार असते की त्यांना अचानक काहीतरी खाण्याची इच्छा होते. काहीतरी खाण्याच्या याच इच्छेला ते नियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यावेळी असे काही पदार्थ खातात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात.
2 / 5
पोटभर जेवल्यानंतर काही वेळातच काहींना चटपटीत किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. यालाच क्रेव्हिंग्स असं म्हणतात. याच क्रेव्हिंग्समुळे अनेकदा आरोग्यासाठी अपायकारक असणारे पदार्थ खाल्ले जातात आणि त्यामुळे वजनही वाढतं.
3 / 5
या क्रेव्हिंग्सवर अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी उत्तम उपाय सांगितला आहे. त्यांच्या मते जर तुम्हाला अचानक काही अनहेल्दी खाण्याची इच्छा झाली तर लगेच त्यावेळी दुसऱ्या कामात स्वत:ला गुंतवून घ्यावं.
4 / 5
असं केल्याने तुमचं मन त्या क्रेव्हिंग्सवरून दुसऱ्या कामात गुंतलं जाईल आणि थोड्या वेळाने तुमची खाण्याची इच्छा निघून जाईल. या सवयीमुळे तुम्हाला वेगळं फारसं काहीच करावं लागत नाही. फक्त जेव्हा कधी अरबट-चरबट खाण्याची इच्छा झाली की स्वत:ला एखाद्या कामात गुंतवून घ्यायचं.
5 / 5
हळूहळू ही तुमची सवय बनेल आणि तुमचे क्रेव्हिंग्सही कमी होतील, असं डॉ. श्रीराम नेने सांगतात. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत. सोशल मीडियावर ते आरोग्याशी संबंधित विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात.