गुंतवणुकीतून वाढतो फंड : निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी लवकरच आर्थिक उपाय योजना करणे हे फायदेशीर ठरते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (EPF) हा एक चांगला पर्याय आहे. कर्मचारी त्याच्या मूळ वेतनातील 12% त्यात रक्कम गुंतवू शकतो.
EPF कसे करते काम : ही भारतातील एक निवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी, नियोक्ता दोघेही ईपीएफओकडे 12% टक्के रक्कम जमा करतात. गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केल्यानंतर त्यातून एक मोठा फंड तयार होतो.
अनावश्यक खर्च, वारेमाप उधळपट्टी, हॉटेलिंग, व्यसनं यापासून दूर राहा. तेव्हा पैसा वाचेल. त्याची बचत होईल. त्याची गुंतवणूक होईल. पैसा वाढेल. कमी वयात ही शिस्त लावल्यास वयाच्या 40 मध्येच तुमच्या गाठी मोठी रक्कम असेल.
स्वयंशिस्त, दीर्घकालीन गुंतवणूक रणनीती, जोखीम घेण्याची तयारी आणि नियमीत बचत या सवयी अंगी भिनवा. तरच तुम्हाला भविष्यात एक मोठी रक्कम उभारता येईल. एक फंड तयार करता येईल.
गुंतवणुकीचे गणित : मूळ वेतन : 16,000 रुपये वार्षिक वेतन वृद्धी : 5% एकूण गुंतवणूक (38 वर्षे) : 34,32,754 रुपये व्याज : 1,19,08,242 रुपये एकूण रक्कम : 1,53,40,996 रुपये