बॉलिवूडमध्ये अनेक परदेशातून आलेल्या अभिनेत्री आहेत ज्यांना आज भारतीय चित्रपटसृष्टीत बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. या अभिनेत्रींनी केवळ त्यांच्या अभिनयानेच नाही तर नृत्य आणि गाण्याच्या कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अॅमी जॅक्सन: ब्रिटीश अभिनेत्री-मॉडेल अॅमी जॅक्सननं बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिनं आतापर्यंत तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. एक दिवाना था, सिंग इज ब्लिंग, फ्रीकी अली, देवी या चित्रपटांमध्ये अॅमी जॅक्सननं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
ऐली लार्टर : हॉन्टेड हिल, फायनल डेस्टिनेशन, फायनल डेस्टिनेशन 2, अ लॉट लाइक लव या चित्रपटांमधील प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री ऐली लार्टरला सगळेच ओळखतात. या अमेरिकन अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. 2007 मध्ये ऐली लार्टरलं सलमान खानबरोबर मेरीगोल्ड चित्रपटात काम केले होते.
यूलिया वंतूर रोमानियन मॉडेल-अभिनेत्री-गायिका आहे. यूलिया वंतूर आणि सलमान खानच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतही यूलियानं आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. अलीकडेच यूलियानं सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटातील ‘सीटी मार’ या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. याशिवाय यूलियाने प्यार दे प्यार ले, पार्टी चल ऑन, हरजाई इत्यादी गाण्यांना आवाज दिला आहे.
नोरा फतेही : नोरा उत्तम डान्सर, मॉडेल, सिंगर, अभिनेत्री आणि निर्माता आहे. नोरा फतेही हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव आहे. हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तामिळ भाषेत तिनं आपली जादू दाखवली आहे. नोराच्या डान्समुळे ती भारतीय प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.
नरगिस फाखरी : अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल नरगिस फाखरी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. रॉकस्टार या हिंदी चित्रपटात तिने पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत काम केलं होतं. या चित्रपटात तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन देण्यात आलं होतं. रॉकस्टार व्यतिरिक्त तिनं मद्रास कॅफे, फटा पोस्टर निकला हीरो, किक, स्पाय (हॉलिवूड), अझर, हाऊसफुल 3, बंजो या चित्रपटांमध्ये काम केलंय आहे.