‘महाकुंभ’मधील सुंदर ‘साध्वी’चीच चर्चा; रातोरात इन्स्टाग्रामवर वाढले इतके फॉलोअर्स

| Updated on: Jan 15, 2025 | 11:07 AM

'महाकुंभ'मधील सर्वांत सुंदर साध्वीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. रातोरात तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तिने सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. मात्र साध्वीची दीक्षा अद्याप घेतली नसल्याचं तिने स्पष्ट केलंय.

1 / 6
13 जानेवारीपासून महाकुंभची सुरुवात झाली असून तिथले बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये दिसलेल्या एका सुंदर 'साध्वी'ने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. नेटकऱ्यांनी तिला 'सर्वांत सुंदर साध्वी' असा टॅगसुद्धा दिला आहे.

2 / 6
या साध्वीचं नाव हर्षा रिछारिया असं आहे. महाकुंभमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ती रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सचा आकडा काही लाखांनी वाढला आहे. हर्षा रिछारिया ही 30 वर्षांची असून ती उत्तराखंडची आहे.

3 / 6
आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्या असल्याचं तिने सांगितलं आहे. हर्षा आधी अँकर आणि अभिनेत्री म्हणून काम करत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तिने सर्व गोष्टींचा त्याग केला आहे.

4 / 6
सोशल मीडियावर फॉलोअर्सचा आकडा वाढल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर हर्षाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं की तिने अद्याप साध्वीची दीक्षा घेतलेली नाही.

5 / 6
"मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकतेय. मात्र मी अजून साध्वी झाली नाही. त्यासाठी एक दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी असं म्हटलं," असं तिने  स्पष्ट केलं.

6 / 6
महाकुंभमध्ये येण्याआधी हर्षाचे इन्स्टाग्रामवर जवळपास सहा लाख फॉलोअर्स होते. आता हा आकडा वाढून दहा लाख इतका झाला आहे.