Marathi News Photo gallery Maharashtra deputy cm ajit pawar seen in unique black safari coat pant dress while meeting with pm narendra modi
Ajit Pawar | कडक इस्त्रीच्या सफारी सुटावर काळा बूट, अजित दादांच्या स्वॅगची गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चा !
आज झालेल्या बैठकीत सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे अजित पवार यांचा ड्रसे होता. अंधूक काळ्या रंगाचा सफारी सूट, काळा बूट
असा कडक ड्रेस त्यांनी घातला होता. त्यांचा हा स्वॅग पाहून अनेकजण चांगलेच भारावले होते.
1 / 7
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची राज्यात बातमी होते. बरं फक्त राज्यातील राजकारणामुळेच अजित पवार चर्चेत असतात असे नाही. त्यांचे चालणे, बोलणे, पेहरावाची पद्धत हासुद्धा राज्यात चर्चेचा विषय़ असतो.
2 / 7
यावेळी आज अजित पवार यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी परिधान केलेला ड्रेस सध्या सर्चेचा विषय ठरतो आहे.
3 / 7
आज झालेल्या बैठकीत सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे अजित पवार यांचा ड्रेस होता. लाईट काळ्या रंगाचा सफारी कोट, काळा बूट असा कडक ड्रेस त्यांनी घातला होता. त्यांचा हा स्वॅग पाहून अनेकजण चांगलेच भारावले होते.
4 / 7
विशेष म्हणजे अजित पवार यांच्या चाहत्यांनी त्यांचा या ड्रेसमधील फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवून सगळीकडे आपल्या अजित दादांचा दरारा असल्याचा दावा केला.
5 / 7
यापूर्वी अजित पवार अधिवेशनासाठी सुटाबुटात दाखल झाले होते. त्याचा हा पेहरावसुद्धा त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. आज पुन्हा एकदा अजित पवार हटके लूकमध्ये समोर आले आहेत. अजित पवार हे मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत काळ्या रंगाच्या सफारी सूटमध्ये दिसले आहेत.
6 / 7
अजित पवार यांनी आज त्यांच्या देहयष्टीला साजेल असा काळ्या रंगाचा सफारी ड्रेस परिधान केला होता. अतिशय कडक आणि स्वच्छ असा हा सूट सर्वांमध्ये उठून दिसत होता. यावेळी त्यांच्या सफारी कोटवर एक काळ्या रंगाचाच युनिक पेन होता. विशेष म्हणजे काळ्या सफारीवर त्यांनी काळ्या रंगाचा बूट घातला होता. यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळा काळा ड्रेस कोड ठरलेला असताना उठून दिसणारा पांढऱ्या रंगाचा मास्क त्यांनी चेहऱ्याला लावला होता.
7 / 7
त्यांच्या या पेहरावाची त्यांच्या चाहत्यांनी तर दखल घेतलीच. पण त्यांच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या लोकांनासुद्धा अजिदादांचा हा स्वॅग चांगलाच भावला...