Marathi News Photo gallery Sangli Flood Deputy CM Ajit Pawar inspects the flood affected area of Sangli, Interaction with flood victims in Bhilwadi
Sangli Flood : सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद
भिलवडीमध्ये अजित पवार यांनी बोटीतून पुराने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि विश्वजीत कदमही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पूरग्रस्तांशीही संवाद साधला.
1 / 6
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आल्यानं नद्यांचं पाणी काठावरील गावं आणि शहरात शिरलं आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात 2019 प्रमाणेच पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली.
2 / 6
पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
3 / 6
भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
4 / 6
भिलवडीमध्ये अजित पवार यांनी बोटीतून पुराने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि विश्वजीत कदमही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पूरग्रस्तांशीही संवाद साधला.
5 / 6
भिलवडी बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. त्यावेळी पुरामुळे दुकानं पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचं अजित पवार यांना पाहायला मिळालं.
6 / 6
पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसरालाही त्यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली.