पुण्यात अवैध गावठी हातभट्टीवर जेसीबी, गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील करंदी गावात अखेर कारवाई

| Updated on: Aug 19, 2021 | 12:40 PM

शिक्रापूर पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी रात्री अवैध गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. दोन दिवसांपूर्वी करंदी गावातील एक गावठी हातभट्टी दारुचा अड्डा गावच्या महिला सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी जाऊन उद्ध्वस्त केला होता.

1 / 6
पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील करंदी येथे अवैध गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे.

2 / 6
MIDC Daru

MIDC Daru

3 / 6
शिक्रापूर पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी रात्री अवैध गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. यावेळी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 / 6
दोन दिवसांपूर्वी करंदी गावातील एक गावठी हातभट्टी दारुचा अड्डा गावच्या महिला सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी जाऊन उद्ध्वस्त केला होता. तब्बल पाच वर्षे पोलिसात तक्रार करुनही गावठी दारुची भट्टी बंद न झाल्याचा आरोप सरपंचांनी केला होता.

5 / 6
 दारुची भट्टी चालवणाऱ्यांना सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अक्षरश: पाठलाग करुन हुसकावून लावलं होतं

6 / 6
पुणे जिल्ह्यातील करंदी गाव हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात येते. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हे गाव दत्तक घेतलेले आहे.