पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत.
त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये.
काही निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने पर्यटक लोणावळ्यात गर्दी करत आहेत.
परतीच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि वातावरणातील गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.