Marathi News Photo gallery Maharashtra Pune Yerawada Under Construction Mall Building Ground Floor Slab Collapse Many Labors Dies Latest Photos
पुण्यात बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब पडला, रात्रीच्या अंधारात मजुरांवर ‘काळ’ कोसळला
मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्लॅब टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत, अशी माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली.
1 / 6
पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळून गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून पाच कामगारांना (Labors Death) जागीच प्राण गमवावे लागले, तर किमान पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
2 / 6
हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचं येरवडा पोलिसांनी सांगितलं. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
3 / 6
फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी केला आहे. आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही टिंगरे म्हणाले.
4 / 6
महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला
5 / 6
Pune Yerawada Under Construction Mall Building Ground Floor Slab Collapse New
6 / 6
स्लॅबच्या जाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकायचे काम सुरु होते. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले