Marathi News Photo gallery Maharashtra Rain Update Amboli village in Sindhudurg recorded highest rainfall in monsoon in state
Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणत्या गावाला म्हणतात?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.
1 / 6
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. तर, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावाची ओळख आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज येथेही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचं समोर आलं आहे.
2 / 6
आंबोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारं ठिकाण आहे. आंबोली गावाला महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हटलं जातं. आंबोलीत वर्षाला साधारणपणानं साडे सात हजारांहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद होते. आंबोली हे दक्षिण महाराष्ट्रातील गाव असून तिथून गोवा आणि कर्नाटक राज्य देखील जवळचं आहे.
3 / 6
पाथरपुंज हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे गाव आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे गाव, 2019 मध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी झाली होती. पाथरपुंज गावाचा विस्तार तीन जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती आहे. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत या गावातील व्यक्तींची घरं आहेत.
4 / 6
महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जवळपास 5 नद्या उगम पावतात. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री नद्या उगम पावतात. या ठिकाणी यंदा जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं तिकडून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी गेलं. महाबळेश्वरवरुन येणारे पाणी तिवरे धरणात साठतं होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिवरे धरण दुर्घटना झाली. आता थेट पाणी चिपळूण शहरात पोहोचलं, असं बोललं जाते.
5 / 6
नवजा: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा येथेही जोरदार पाऊस झाला. नवजाला सातशे मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. त्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात विक्रमी वाढ झाली. 24 तासात 18 टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक कोयना धऱणात झाली. नवजा येथून चिपळूणला जाण्यासाठी मार्ग आहे. पण त्यावर देखील दरड कोसळली होती.
6 / 6
गगनबावडा :कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात होतो. पुराच्या पाण्यानं अनेकदा गगनबावडा तालुक्यात रस्त्यावर पाणी आलेलं पाहायला मिळतं. तर, माथेरनामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो.