इरई नदीचं पाणी चंद्रपूर शहरात शिरलं आहे. त्यामुळे चंद्रपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपूर शहरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. चंद्रपुरातून धडकी भरवणारे फोटो समोर आलेत.
चंद्रपूर शहरात 8 ते 10 फूट पाणी आहे. चंद्रपूरला सध्या पाण्याने वेढा घातला आहे. लोकांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्याचा आधार घेतला आहे.
NDRF कडून चंद्रपूर शहरात मदतकार्य सुरु आहे. एनडीआरएफचे जवान संपूर्ण भाग पिंजून काढत आहे. प्रत्येक घराजवळ जाऊन कोणी आहे का? म्हणून विचारणा सुरु आहे.
सध्या चंद्रपूर शहरात मदतकार्य सुरु आहे. प्राण वाचवण्यासाठी लोक घराच्या छतावर चढले आहेत.
चंद्रपूर विदर्भात येतं. तिथल्या भीषण पूरस्थितीमुळे अनेक वाहन अडकून पडली आहेत.