Mahindra Scorpio-N खरेदीवर चांगली ऑफर, मिळतेय इतक्या लाखांची सूट
महिंद्राने आपली लोकप्रिय कार Scorpio-N SUV वर तगडी डिस्काऊट ऑफर दिली आहे. तुम्ही ही कार विकत घेणार असाल, तर इतक्या लाखांचा डिस्काऊंट मिळू शकतो. समजून घ्या या पूर्ण ऑफर बद्दल.
1 / 5
Scorpio-N च्या 7-सीटर Z8 आणि Z8L डीजल 4x4 वेरिएंट्सचे मॅनुअल आणि ऑटोमेटिक दोन्ही मॉडलवर डिस्काऊंट ऑफर लागू आहे. दोन्ही वेरिएंटच्या 6 आणि 7-सीटर 4x2 ऑटोमेटिक, डीजल/ पेट्रोल मॉडल्स वर डिस्काऊंट ऑफर आहे.
2 / 5
स्कॉर्पियो-एनच्या Z8 आणि Z8L डीजल 4x4 वेरिएंट्स वर 1 लाख रुपयापर्यंतचा कॅश डिस्काऊट मिळतोय. Z8 आणि Z8L डीजल 4x2 ऑटोमेटिक आणि पेट्रोल ऑटोमेटिक वेरिएंट्सवर 60 हजार रुपयांची सवलत दिली जातेय.
3 / 5
स्कॉर्पियो-एन मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलय. त्यातून 203bhp पावर जनरेट होते. दुसरा ऑप्शन 2.2 लीटर डीजल इंजिनचा आहे. त्यातून 175bhp पावर जनरेट होते. दोघांसोबत 6-स्पीड मॅनुअल आणि 6-स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतोय.
4 / 5
Mahindra Scorpio-N ची किंमत सध्या 13.60 लाख रुपयापासून सुरु होते. 24.54 लाख रुपया पर्यंत ही किंमत आहे. ही किंमत एक्स-शोरूमच्या हिशोबाने आहे. SUV वर कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस दिला जात नाहीय.
5 / 5
डीजल मॉडल्ससोबत 4-व्हील ड्राइवचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या SUV चा सामना हुंडई अल्काजर, एमजी हेक्टर प्लस आणि टाटा सफारी सोबत आहे.