Mahindra Thar Roxx Features : या 6 फीचर्समुळे नवीन 5 डोर ‘थार रॉक्स’ आहे खास, सेफ्टीच्या दृष्टीने कशी? जाणून घ्या
Mahindra Thar Roxx Dimensions : महिंद्रा थारच नवीन 5 डोर वर्जन खरेदी करण्याचा प्लान करताय का? तर त्याआधी या SUV मध्ये मिळणाऱ्या खास फिचर्सबद्दल जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला या एसयूवीमध्ये मिळणारे 6 खास फीचर्स, गाडीची किंमत आणि डायमेंशनबद्दल डिटेल माहिती देणार आहोत.
-
-
पहिलं खास फीचर आहे सेफ्टी : 5 डोरच्या महिंद्रा थारमध्ये 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एयरबॅग्स, सर्वांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, 3 प्वाइंट सीट बेल्ट्स, चाइल्ड सीटसाठी ISOFIX सपोर्ट देण्यात आलाय.
-
-
दुसरं खास फीचर आहे 360 डिग्री व्यू : थारच्या 5 डोर मॉडलमध्ये ग्राहकांना 360 डिग्री सराऊंड व्यू सिस्टम देण्यात आला आहे. ड्रायविंग करताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
-
-
तिसर खास फिचर ADAS : महिंद्रा थारच्या 5 डोर वर्जनमध्ये ग्राहकांना सेफ्टीसाठी केवळ 2 ADAS फीचर्स देण्यात आले आहेत. यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल आणि ब्लाइंड व्यू मॉनिटर सारखे फीचर्स आहेत.
-
-
चौथं खास फिचर, पॅनोरमिक सनरूफ: 3 डोर वर्जनमध्ये हे फिचर मिळत नाही. ग्राहकांमध्ये हे फिचर खूप पॉपुलर आहे. प्रत्येकाला पॅनोरमिक सनरूफ असलेली कार हवी असते. म्हणून नव्या थारमध्ये या फिचरचा समावेश करण्यात आला आहे.
-
-
पाचवं खास फीचर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स : नव्या थारमध्ये ग्राहकांच्या सुविधेसाठी वेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ऋतुमध्ये ही सीट तुमची काळजी घेईल. विशेषकरुन उन्हाळ्यात.
-
-
सहावं खास फीचर, कनेक्टेड कार फीचर्स : नव्या महिंद्रा थारमध्ये तुम्हाला 80 पेक्षा जास्त कनेक्टेड फिचर्स मिळतील. यात वायरलेस एंड्रॉयड ऑटो-एपल कारप्ले आणि ऐलेक्सा सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.
-
-
Mahindra Thar Roxx Price : या एसयूवीची किंमत 12 लाख 99 हजार रुपयापासून सुरु होते. कारच्या बेस वेरिएंटची ही किंमत आहे. या कारच्या टॉप वेरिएंटसाठी (AX7L) 20 लाख 49 हजार रुपये खर्च करावे लागतील.