Mahira Khan पासून ते फवाद खान पर्यंत, पाकिस्तानी कलाकार पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार?

| Updated on: Oct 21, 2023 | 1:30 PM

पाकिस्तानी कलाकारांनी भारतात यायचं नाही, त्यांनी कुठलंही काम करायचं नाही. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झालीये. सुनावणीत काय निकाल दिला गेलाय ते ऐकून जर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चाहते असाल तर तुम्हाला अत्यानंद होईल.

1 / 5
"पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालावी" अशी मागणी करणारी ही याचिका. मुंबई हाय कोर्टात यावर निकाल देण्यात आलाय. काय आहे तो निकाल? काय वाटतं? सिनेरसिकांना हे वाचून धक्का बसणारे...

2 / 5
ही याचिका फेटाळण्यात आलीये, होय! 2016 मध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. उरी हल्ल्यानंतर ही मागणी केली गेली होती. आता ही याचिका फेटाळण्यात आलीये.

3 / 5
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुवील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांनी याचिकेत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. याचा अर्थ असा की आता तुम्हाला तुमचे आवडते पाकिस्तानी कलाकार चित्रपटांमध्ये बघायला मिळू शकतात.

4 / 5
तुम्ही जर पाकिस्तानी कलाकारांचे चाहते असाल तर आहे ना तुमच्यासाठी ही खुशखबर! सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिलाय.

5 / 5
अनेक वर्षानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू सुद्धा भारतात आले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच चांगलीच रंगली होती, चाहत्यांनीही याची चांगलीच मजा घेतली. आता कोर्टाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी कलाकारा सुद्धा असेच भारतात दिसू शकतात. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, फवाद खान, मावरा आणि अली जफर बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकले आहेत.