मलायका अरोराचा आज 50 वा वाढदिवस! मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती फिटनेस योगा करते आणि तिचे योगा करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा मलायका तिशीत असल्यासारखी वाटते.
तुम्हाला ती छय्या छय्या गाण्यामधली सुरवातीला दिसणारी अभिनेत्री आठवते? जी गाणं म्हणत असते? ती दुसरी तिसरी कुणी नसून मलायका आहे. हे गाणं खूप हिट ठरले, आजही हे गाणं हिट आहे. मलायका अरोराने याच गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या गाण्यानंतर मालयकाने अनेक आयटम सॉंग केले, तिने केलेले सगळे आयटम नंबर खूप फेमस झाले. मालयकाने कधी बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं नाही पण तरीही तिची लाईफ खूप luxurious आहे. काय असेल मलायकाचं नेटवर्थ?
मलायका कोट्यवधींची मालकीण आहे. मुंबईत बांद्रा सारख्या ठिकाणी मलायकाचं घर आहे आणि हे घर 20 कोटी रुपयांचं आहे. त्याचबरोबर तिच्याकडे 1.38 कोटी रुपये किंमतीच्या BMW 7 सीरिज, 20 लाखाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, 96 लाख रुपये किंमतीच्या BMWX 7 आणि 2.11 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वॉग सारख्या लक्झरी कार देखील आहेत.
मलायका अरोरा फिल्म्स मध्ये दिसत नसली तरीही ती मॉडेलिंग शोज, रियॅलिटी शोज जज करते. एका एपिसोडसाठी अभिनेत्री जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये चार्ज करते. याशिवाय मलायका काही ब्रॅण्ड्सची ब्रँड अँबेसडर आहे ज्याचे तिला महिन्याला 70 लाख ते 1.6 करोड मिळतात. मलायका अरोराचा नेटवर्थ 98.98 करोड आहे.