मलायकाच्या वडिलांची आत्महत्या; अरबाज, अर्जुनसह खान कुटुंबातील हे सदस्य पोहोचले घटनास्थळी
अनिल अरोरा हे मर्चंट नेवीमध्ये काम करायचे. मलायका 11 वर्षांची असतानाच तिचे आईवडील विभक्त झाले होते. गेल्या वर्षी अनिल यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
1 / 10
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
2 / 10
वडिलांच्या आत्महत्येविषयी समजताच मलायका पुण्याहून मुंबईला परतली. काही कामानिमित्त ती पुण्याला गेली होती.
3 / 10
मलायकाच्या पाठोपाठ तिची छोटी बहीण अमृता अरोरासुद्धा घटनास्थळी पोहोचली. अनिल अरोरा हे मलायका आणि अमृता यांचे वडील असून त्यांच्या आईचं नाव जॉइस पॉलिकार्प असं आहे.
4 / 10
घटनेविषयी माहिती मिळताच मलायका अरोराचा पूर्व पती आणि अभिनेता-निर्माता अरबाज खान घटनास्थळी पोहोचला.
5 / 10
अरबाजसोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही या कठीण काळात मलायकाच्या बाजूने उभं राहण्यासाठी याठिकाणी पोहोचले. सलमान आणि अरबाजचे वडील सलीम खान घटनास्थळी पोहोचले आहेत.
6 / 10
अरबाजची आई सलमा खानसुद्धा याठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यांच्यासोबत अरबाजचा भाऊ सोहैल खान आणि त्याचा मुलगाही होता.
7 / 10
अरबाजची बहीण अलविरा खानसुद्धा घटनास्थळी पोहोचली. अरबाज आणि मलायका हे 19 वर्षे विवाहबंधनात होते. त्यामुळे अरबाजच्या कुटुंबीयांशी मलायकाचं अजूनही खास नातं आहे.
8 / 10
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसुद्धा तातडीने घटनास्थळी पोहोचला होता.
9 / 10
अनिल अरोरा यांनी वांद्रे इथल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
10 / 10
मलायका अरोरा 11 वर्षांची असतानाच तिचे आईवडील विभक्त झाले होते. त्यावेळी मलायकाची छोटी बहीण अमृता अरोरा ही फक्त सहा वर्षांची होती.