दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'भूत' सिनेमातून अभिनेत्री बरखा मदान हिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने संन्यास घेतला.
अनघा भोसले हिने देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. देशातील सर्वांत मोठा शो 'अनुपमा' मध्ये तिने काम केलं. पण अखेर अनघा हिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
ममता कुलकर्णी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. त्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला. शिवाय 12 वर्ष तपस्या देखील केली.
ग्लॅमर आणि मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री इशिका तनेजा हिच्या नावावर गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड देखील आहे. असं असताना देखील तनेजा हिने फार कमी वयात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
बॉलिवूडमध्ये नीता मेहता हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा नीता हिन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.