डिझायनर मनीष मल्होत्रा हे सध्या जोरदार चर्चेत आहेत. विशेष म्हणजे मनीष मल्होत्रा हे दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर बायोपिक तयार करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.
आता या चर्चांवर मनीष मल्होत्राने माैन सोडत मोठे भाष्य हे केले आहे. मनीष मल्होत्रा म्हणाले की, ही गोष्ट बाहेर कशी आले हेच मला मुळात कळत नाहीये. मात्र, हे खरे आहे.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मनीष मल्होत्रा म्हणाले की, आता सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. मी सध्या त्यांच्यावर आधारित असलेले पुस्तके वाचत आहे.
मनीष मल्होत्राने हे देखील स्पष्ट केले की, सध्या चित्रपटावर काम सुरू आहे. मध्यंतरी रिपोर्ट होती की, मीना कुमारी यांचा सावत्र मुलगा अमरोही खुश या चित्रपटामुळे नाहीये.
आता मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीचे उत्सुकता ही बघायला मिळत आहे. आता चाहते या चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत.