मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबई वाशीमध्ये आहेत. थोड्याचवेळात त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करतील.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपासून काही अंतरावर आहेत. नवी मुंबई वाशीच्या शिवाजी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव शिवाजी चौकात जमले आहेत. जिथे नजर जाईल तिथे भगवे झेंडे दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सगे-सोयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. जीआरमध्ये या शब्दाचा समावेश करावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी नवी मुंबईत प्रचंड गर्दी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड क्रेझ गर्दीमध्ये दिसून येत आहे. ते आज मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत.