Manoj jarange Patil | ‘मला तुमची माया कळतीय, पण…’, स्टेजवर कोसळल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले….

| Updated on: Oct 30, 2023 | 2:21 PM

Marath Reservation | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटलाय. मुख्य आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळलीय. काही ठिकाणी हिंसक विरोध प्रदर्शन झाल्याच्या बातम्या येत आहेत.

1 / 5
मनोज जरांगे पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावलीय. शरीरात ताकत नाहीय.

2 / 5
मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. उपोषणाचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालाय.

3 / 5
ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याच आवाहन करत होते. 'पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या' अशी घोषणाबाजी गावकऱ्यांकडून सुरु होती.

4 / 5
"तुमची माया मला कळतेय. मी पाणी प्यायलो तर लेकराला कस न्याय मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

5 / 5
"समाजाच तुम्हाला ऐकावच लागेल. आज तुम्हाला पाणी प्यावच लागेल असा आवाज समोर असलेल्या गर्दीतून आला"