बाजरीची इडलीचा स्वाद लजवाब अन् जाणून घ्या आरोग्यासाठी फायदे किती?
Bajra Idli Recipe: बाजरी आरोग्यासाठी सर्वात चांगले धान्य आहे. हिवाळ्यात बाजरीचे पदार्थ खाल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. बाजरीची भाकरी अनेकांना माहीत आहे. परंतु कधी बाजरीची इडली खाल्ली आहे का? जाणून घेऊ या बाजरीची इडली बनवण्याची पद्धत आणि फायदे.
1 / 5
बाजरीत प्रोटीन, आयरन, मॅग्नीशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्व आहे. बाजरीचे सेवन पोटासाठी अमृतासारखे आहे. ज्या लोकांना गॅस आणि एसिडिटीची समस्या आहे, त्यांच्यासाठी बाजरी वरदान ठरणार आहे.
2 / 5
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी बाजरी खूप फायदेशीर आहे. त्यात ग्लूटेन नसते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. बाजरीचे सेवन केल्याने पचनक्रियाही निरोगी राहते.
3 / 5
बाजरी इडली हा नाश्त्यासाठी आरोग्यदायी आणि स्टायलिश पर्याय आहे. बाजरीची इडली बनवण्यासाठी 1 कप बाजरी , 1 कप ताक, 1 चमचा काळी मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे.
4 / 5
बाजरीची इडली बनवण्यासाठी एका भांड्यात बाजरीचे पीठ ठेवा. त्यात एक कप ताक घाला. साधारण दोन तास भिजत ठेवा. नंतर काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात इनो टाका. घोळ चांगला मिक्स करुन घ्या.
5 / 5
इडलीच्या भांड्यावर चांगले तेल लावा. आता बाजरीचे पीठ इडलीच्या भांड्यात भरा. भांडे बंद करा आणि सुमारे 10-12 मिनिटे इडली शिजवा. गॅस बंद केल्यानंतर इडली भांड्यातून काढून थंड होऊ द्या. यानंतर ही पौष्टिक इडली तुमच्या आवडत्या चटणीसोबत खा.