Marathi News Photo gallery Many states, including Bihar and Jharkhand, are participating in the 'Agneepath' scheme. High alert in many places
Agneepath scheme: अग्निपथ’ योजनाच्या विरोधात आज भारत बंदची हाक बिहार-झारखंडसह अनेक राज्यांचा सहभाग ; अनेक ठिकाणी हायअर्लट
भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.
1 / 7
केंद्राच्या 'अग्निपथ' लष्करी भरती योजनेला विरोध होत असताना, काही संघटनांनी सोमवारी (20 जून) भारत बंदची हाक दिली आहे. बंदची माहिती मिळताच सरकारही सतर्क झाले आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
2 / 7
भारत बंद आणि काँग्रेसच्या निदर्शनांमुळे गुरुग्राम आणि अक्षरधाम परिसरात प्रचंड जाम झाला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत वाहने दिसतात. जाममुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऑफिसला निघालेले लोकही जाममध्ये अडकले आहेत.
3 / 7
भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.
4 / 7
पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये भारत बंदचा प्रभाव दिसून आला नाही. येथील जनजीवन सामान्य आहे. सर्व शाळा, कार्यालये सुरू आहेत. मात्र, बंदची हाक पाहता सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. सर्वत्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
5 / 7
पश्चिम बंगालमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात 'भारत बंद' पुकारण्यात आल्याने हावडामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. डीसीपी उत्तर अनुपम सिंह यांनी सांगितले की, सर्वत्र पोलिस तैनात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. तरुणांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
6 / 7
अग्निपथ योजनेच्या विरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा आज बंद आहेत.
7 / 7
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथील डाक बंगला चौकात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.