नवीन वर्ष 2025 साठी तुमच्या लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्रींचे संकल्प काय?

| Updated on: Dec 31, 2024 | 12:27 PM

नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो. मग तो एक सर्वसाधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी असो. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊयात त्याविषयी..

1 / 6
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराज म्हणाली -  "माझ्या 2025 च्या 'टू डू लिस्ट'मध्ये सर्वात पहिलं आहे, कथ्थक विशारद परीक्षा. जी मला द्यायची आहे. 2024 मध्ये मला परीक्षा द्यायची होती. पण 'नवरी मिळे हिटलरला' मालिका मिळाली आणि त्याच्या शूटमध्ये मी व्यस्त जाले. माझी विशारद पूर्ण करायची तयारी सुरू आहे. त्यासोबत मला वाचनाची सवय लावून घ्यायची आहे, तब्येतीची काळजी घ्यायची आहे."

2 / 6
'सावळ्याची जणू सावली'मध्ये  सावली साकारत असलेली  प्राप्ती रेडकर म्हणाली, "2025 मध्ये ज्या  टॉप तीन गोष्टी  करायच्या आहेत, त्या मधली पहिली म्हणजे मला फिट राहायचं आहे. मला प्रॉपर डाएट करायचं आहे. कारण त्यात मी शून्य आहे. दुसरं म्हणजे आळशीपणा न करता मला माझं स्पोर्ट्स चालू ठेवायचं आहे. तिसरी ही की आई- बाबांना अभिमान वाटेल असं काम करत राहायचं आहे."

3 / 6
'लाखात एक आमचा दादा'मधील तुळजा म्हणजेच दिशा परदेशी म्हणाली, "माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी नवीन वर्षात कामाशी जोडलेल्या सर्व गोष्टी करणार आहे. जेवढं जास्त आणि उत्कृष्ट काम करता येईल तेवढं करणार आहे. स्वतःवर मेहनत घेणार आहे. मला माझं एक स्थान  निर्माण करायचं आहे.  दुसरी गोष्ट ही की मी एक ट्रॅव्हलर आहे, तर  अगदी चा दिवसांची सुट्टी जरी मिळाली, तरीही एखादं देश मी फिरेन."

4 / 6
'लक्ष्मी निवास'मधली जान्हवी म्हणजेच  दिव्या पुगावकर म्हणाली, "पहिलं तर मला ड्राइव्हिंग शिकायचं आहे.  मी कथ्थक क्लासेस सुरु केले होते. तर तेही अर्धवट राहिले आहे, ते पूर्ण करणार आहे. मला डान्समध्ये एक प्रकार तरी शिकायचा आहे. मग तो बॉलिवूड असो किंवा सेमी क्लासिकल. तिसरी गोष्ट अशी की मला वाचनाची आवड नाहीये, त्यामुळे वाचनाची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करीन."

5 / 6
'लक्ष्मी निवास' मधली भावना म्हणजेच अक्षया देवधरने सांगितलं, "2025 मध्ये  मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, दुसरी गोष्ट आता कामात ब्रेक नाही आणि 'लक्ष्मी निवास'मध्ये छान काम करायचं आहे. तिसरी गोष्ट, मला माझं वजन कमी करायचं आहे, ज्यासाठी मी डाएट आणि वर्कआऊट दोन्हीही सुरू केले आहेत."

6 / 6
'लक्ष्मी निवास'मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत असलेल्या हर्षदा खानविलकर म्हणाल्या, "नवीन वर्षाची सुरुवात अगदीच उत्तम झाली आहे. मी 'लक्ष्मी निवास'मध्ये लक्ष्मी म्हणून एक वेगळी भूमिका साकारत आहे. तर माझा प्रयत्न आहे की मला अधिक  छान काम करता आलं पाहिजे आणि ते लोकांना आवडेल याची  अपेक्षा आहे. शूटिंग मधून  वेळ मिळाला की ट्रॅव्हलही करीन. तसं तर माझं स्वप्न आहे जगभर फिरायचं. मी कॉलेज काळातल्या कादंबरीमध्ये वाचलेल्या काही जागा आहेत जिथे मला जायचं आहे. पण सध्या  'लक्ष्मी निवास' माझं  प्राधान्य आहे."