Marathi News Photo gallery Mata vaishno devi incident jammu kashmir know list of stampede tragedies of india when and where people lost lives
Stampede | वैष्णवदेवी मंदिराप्रमाणेच या 7 मंदिरात झाली होती चेंगराचेंगरी, ज्यात महाराष्ट्रातीलही 1 मंदिर!
वैष्णवदेवी मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी जमले होते. दरम्यान पहाटेच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक जणं गंभीर जखमी झालेत.
1 / 7
1 जानेवारी 2022 - वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णव देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. आतापर्यंत 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर तेरा जण जखमी झालेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. दरम्यान, या घटनेतील मृतांना बारा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
2 / 7
21 एप्रिल 2019 - तामिळनाडूतील करुप्पास्वामी मंदिरातही चेंगराचेंगरी होऊन जवळपास सात जणांचा मृत्यू झाला होता. तर 10 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करत मृतांच्या नातलगांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर जखमींना पन्नास हजार रुपयेंची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. चैत्र पौर्णिमेला ही दुर्घटना घडली होती. मोठ्या संख्येनं भाविक तेव्हा पुजेसाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते.
3 / 7
13 ऑगस्ट 2019 - बिहारच्या गरीबनाथ मंदिरातही चेंगराचेंगरी झाली होती. यात एकूण पंधरा लोक जखमी झाले होते. सुदैवानं यात कुणाचाही जीव गेला नव्हता. शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी जमा झालेल्या गर्दीमुळे एकच गोंधळ उडून चेंगराचेगरी यावेळी झाली होती.
4 / 7
2017 आणि 2011 - केरळच्या शबरीमाला मंदिरात दोनदा चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत 2017 साली 25 जण झखमी जाले होते. तर 2011 झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 106 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.
5 / 7
3 ऑगस्ट, 2008 - हिमाचल प्रदेशातील एका प्रसिद्ध मंदिरातही चेंगराचेंगरी झाली होती. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यात श्रीनयना देवी हे प्रसिद्ध मंदिर आहे. गोंधळ उडाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन तब्बल 145 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 150 भाविक गंभीर जखमी झाले होते.
6 / 7
30 सप्टेंबर 2008 - राजस्थानातील जोधपुरात असलेल्या चामुंडा देवी मंदिरातही चेंगराचेंगरी झाली होती. नवरात्रौत्सवादरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 120हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 200 पेक्षा जास्त लोकं गंभीर जखमी झाले होते.
7 / 7
26 जानेवारी 2005 - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या मंधेर देवीच्या मंदिरात भीषण चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये तब्बल 350 जणांचा मृत्यू झाला होता. यात 500 हून अधिक जण जखमी झाले होते. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झाल्यामुळे यावेळी मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.