कोण आहे अनंत अंबानीची मेहुणी? फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘अभिनेत्रीइतकीच सुंदर..’

| Updated on: Mar 06, 2024 | 10:25 AM

सध्या सोशल मीडियावर अंबानींच्या कार्यक्रमाचीच जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आणखी एक व्यक्ती लाइमलाइटमध्ये आली आहे. ही व्यक्ती आहे अनंत अंबानीची मेहुणी अंजली.

1 / 5
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची चर्चा अजूनही सोशल मीडियावर आहे. अंबानींच्या या भव्यदिव्य फंक्शनमध्ये एक खास व्यक्ती प्रकाशझोतात आली. ही व्यक्ती आहे अनंत अंबानीची मेहुणी आणि राधिका मर्चंटची बहीण अंजली मर्चंट मजिठिया.

2 / 5
अंजली मर्चंट मजिठिया ही 'एनकोअर फार्मस्युटिकल्स'चे सीईओ वीरेन मर्चंट आणि त्यांची पत्नी शैला मर्चंट यांची मोठी मुलगी आहे. तर राधिका ही त्यांची छोटी मुलगी आहे.

3 / 5
अंजली मर्चंट मजिठियाचा जन्म 1989 मध्ये मुंबईत झाला. तिने 'द कॅथेड्रल', 'जॉन कॉनन स्कूल' आणि 'एकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूल'मधून शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणानंतर तिने बॅबसन कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि उद्योजकतेमध्ये बीएससीची पदवी संपादित केली.

4 / 5
अंजली ही स्वत: उद्योजिका असून ती 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाइन मार्केटप्लेसची सहसंस्थापिका आहे. विद्यार्थी आणि कॉलेज स्टाफ यांच्यासाठीची ही मार्केटप्लेस 2012 मध्ये बंद झाली. अंजली ही 'ड्रायफिक्स'चीही सहसंस्थापिका आहे. 2018 मध्ये याची स्थापना झाली असून हेअर स्टायलिंग आणि ट्रिटमेंट क्लब्सची ही चेन आहे.

5 / 5
अंजलीने 2020 मध्ये बिझनेसमॅन अमन मजिठियाशी लग्न केलं. 'वॅटली इंडिया' या कपड्यांच्या ब्रँडचे ते संस्थापक आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमधील अंजलीचेही बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.