मेहेरगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी ही संपूर्ण डिजीटल असून त्यामुळे गावातील मुलांना शहराकडे जाण्याची गरज भासत नाही.
सध्या कार्यान्वित असलेल्या सोलर प्लाँटमधून काही घरांना मोफत वीज पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संपूर्ण गावाला मोफत वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारला जाणार आहे.
ग्रामपंचायतीने गावासाठी 10 केव्हीचा सोलर प्लांट खरेदी केला आहे. या सोलर प्लांट च्या माध्यमातून संपूर्ण गावासाठी मोफत पिठाची गिरणी चालवली जाते.
मेहेरगावात आरओ प्लॅन्ट उभारण्यात आलाय. संपूर्ण गावाला आरओचे पाणी मोफत दिले जाते.
म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार , पेपरलेस ग्रामपंचायत पुरस्कार , स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार ,पाणी फाऊंडेशन पुरस्कार अशा पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.