नियमित व्यायाम : एंडोर्फिन हे मूड लिफ्टर आहेत, त्याने मूड चांगला होतो. नियमित व्यायाम केल्याने एंडोर्फिन बाहेर पडतात. नियमित व्यायाम केल्यास मूड चांगला राहतो आणि नैराश्य येत नाही. चालणे, धावणे, डान्स करणे, सायकल चालविणे या प्रकारांचा यात समावेश होतो.
गाढ झोप: चांगली झोप आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर झोप चांगली येते आणि झोप चांगली झाली की मानसिक आरोग्य चांगलं राहतं. गाढ झोप यावी यासाठी तुमचा दिनक्रम पण व्यवस्थित असावा. झोपेची ठरलेली वेळ असेल तर त्या वेळात झोप नक्की येणार.मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही रोज ७ ते ९ तास झोप घ्यायलाच हवी.
संतुलित आहार: आहार चांगला असल्यास आरोग्यावर सर्वार्थाने चांगला परिणाम होतो. संतुलित आहार घ्या आणि बदल बघा. आहार चांगला असल्यास झोप सुद्धा चांगली येते. मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि नैराश्य येत नाही.
तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवला तर तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. जवळच्या लोकांसोबत अर्थपूर्ण संभाषण केल्यास नैराश्य येण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे लोकांशी चांगले संबंध जोपासा त्याने एकटेपणा येणार नाही.
ज्या गोष्टी साध्य होऊ शकतात त्याच गोष्टींची अपेक्षा करावी. गोल्स सेट करताना ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच करा. अशक्य गोल ठेवला आणि तो पूर्ण करता आला नाही तर नैराश्य ओढवू शकतं. नैराश्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर शक्य असलेले गोल ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा.