मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनाही फिरण्याची खूप आवड आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघं अनेकदा भटकंतीचे फोटो पोस्ट करत असतात.
नुकतेच हे दोघं लंडनला फिरायला गेले होते. या लंडन ट्रिपचे सुंदर फोटो दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लंडनमधील प्रसिद्ध टॉवर ब्रीचजवळील मितालीचा हा फोटो.
स्कॉटलँडमधील सिद्धार्थचा हा फोटो मितालीने क्लिक केला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ही ट्रिप अविस्मरणीय झाल्याचं म्हटलंय.
एडिनबर्गमधील आर्थर्स सीट हे उंचावरील ठिकाण आहे. इथल्या नयनरम्य दृश्यात हरवलेली मिताली.
सिद्धार्थ मितालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
लंडनमधून परतल्यानंतर सिद्धार्थ आणि मिताली नव्या घरात राहायला जात आहेत. जुन्या घरातील आठवणींची एक पोस्ट दोघांनी इन्स्टाग्रामवर लिहिली होती.
नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी आणि शूटिंगमध्ये पुन्हा व्यग्र होण्याआधी दोघांनी लंडन ट्रिपचा मनमुराद आनंद लुटला.
सिद्धार्थ आणि मितालीचे हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा लंडनच्या प्रेमात पडाल. लंडन ट्रिपवरून परतल्यानंतरही मितालीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
मितालीचा 'हॅशटॅग प्रेम' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने सुयश टिळकसोबत काम केलं होतं.
सिद्धार्थ लवकरच 'एक हाताचं अंतर' या चित्रपटात झळकणार आहे. प्रकाश कुंटेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.