मध हा केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. मध त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास व संरक्षण करण्यास मदत करतो. तसेच त्वचेचे टॅनिंग आणि डाग काढून टाकण्यास मदत करतो. त्वचेसाठी मधाचा वापर कसा करू शकतो, ते जाणून घेऊया.
त्वचा घट्ट करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यासाठी चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं मध लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने त्वचा घट्ट होते.
क्लींजिंगसाठी - एका भांड्यात थोडे दूध घ्यावे. त्यात अर्धा चमचा मध घालावा. हे मिश्रण एकत्र करून कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. ते 10 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हे मिश्रण शुद्धीकरणाचे काम करते.
स्क्रब - एका बाऊलमध्ये एक चमचा मध घ्या, त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावावे. व काही काळ तसेच राहू द्यावे. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुऊन घ्यावा.
फेस पॅक - एका बाऊलमध्ये 1 चमचा चंदन पावडर घ्यावी. त्यामध्ये थोडा मध घालावा. या दोन्ही गोष्टी नीट एकत्र करून ते मिश्रण चेहरा आणि मानेवर लावावे व काही काळ त्वचेवर राहू द्यावे. थोड्या वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुऊन घ्या.