Sharmila Thackeray : महिलांवरील अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? शर्मिला ठाकरेंचा थेट सवाल

| Updated on: Sep 25, 2024 | 2:14 PM

Sharmila Thackeray : मनसेने दिलेले पैसे लहान मुलींच्या संस्थेला द्या. उपचार घेत असेलल्या तिन्ही पोलिसांनी मनसेला सांगितलं. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले होते 51 हजार रुपये बक्षिस. अक्षय शिंदे याला गोळी मारली म्हणून दिले होते 51 हजार रुपये बक्षिस. जुपीटर हॅास्पिटल मध्ये येवून उपचाराकरता दाखल पोलिसांची शर्मिला ठाकरे यांनी घेतली भेट.

1 / 5
कायद्यामुळे गुन्हेगाराला शासन करायला विलंब होतो त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "पोलिसांनी त्यांचं काम केलं. कायद्याचा किस पडतो. त्या मुली इतक्या लहान होत्या की, सहावर्षांनी मुलीना कोर्टात उभं  केलं असतं, तर त्यांच्यासोबत काय घडलं? हे सांगता आलं नसतं, गुन्हेगाराला ओळखता आलं असतं का?"

2 / 5
"कोर्टात एक-दोन महिन्यात निकाल लागला पाहिजे. कोर्टात लवकर निकाल लागला, तर उत्तम आहे. पण निकाल लागत नसतील लवकर तर हे उत्तम आहे" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

3 / 5
असे प्रकार लोकशाहीला मारक आहे असं म्हटलं जातय त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "महिलांवर अत्याचार होतात, ते लोकशाहीला मारक आहेत असं वाटत नाही का? ते पूरक आहेत का? बलात्कार प्रकरणात  मी एका महिन्यात तीन महिलांना भेटले. ते लोकशाहीला पूरक आहे का?"

4 / 5
विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतायत, त्या मुद्यावर शर्मिला ठाकरे थेट बोलल्या. "हा सगळ मूर्खपणा आहे. हैदराबादमध्ये एका मुलीवर बलात्कार झालेला. हैदराबाद पोलिसांनी चारही गुन्हेगारांच ग्राऊंडवर एन्काऊंटर केलेलं. त्याचवेळी हे विरोधी पक्ष हैदराबाद पोलिसांच कौतुक करत होते, मग आता महाराष्ट्र पोलिसांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी केला"

5 / 5
"आपल्याकडे कायदे अतिशय तकलादू आहेत. ब्रिटीशकालीन कायदे आहेत.  कायदे बदलले पाहिजेत. तेव्हा कायदे फास्ट नसतील, गुन्हे तेवढे घडत नसतील. लोकसंख्या एवढी नसेल. आता कायदे फास्ट करण्याची गरज आहे" असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.  .