RR vs CSK IPL 2022: Moeen Ali चा राजस्थानला दणका, फोर-SIX ने पूर्ण केली हाफ सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये 5 फोर, 1 SIX

| Updated on: May 20, 2022 | 10:59 PM

चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीजनमध्ये खूप खराब कामगिरी केली. चेन्नईच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी निराश केलं. मोईन अली अशाच खेळाडूंपैकी एक आहे.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीजनमध्ये खूप खराब कामगिरी केली. चेन्नईच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी निराश केलं. मोईन अली अशाच खेळाडूंपैकी एक आहे. इंग्लंडच्या या खेळाडूने मागच्या सीजनमध्ये CSK ला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण यंदाच्या सीजनमध्ये तो खास काही करु शकला नाही. आज सीजनमधला शेवटचा सामना खेळत असताना मोईन अलीने आपला जलवा दाखवला.

2 / 5
ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई मोसमातील शेवटचा सामना खेळतेय. मोईन अलीने आजच्या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी केली. त्याने पावरप्लेमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पावरप्लेमध्ये मोईनने अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. त्याने 57 चेंडूत 93 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 3 षटकार होते.

3 / 5
पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेल्यामुळे क्रीझवर आलेल्या मोईन अलीने पावरप्लेचं सहाव षटक पूर्ण होईपर्यंत अर्धशतक झळकावलं होतं. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या सीजनमधलं दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक होतं. मोईन अलीने फक्त चौकार-षटकारांनी हे अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांनी अर्धशतक पूर्ण केलं. या दरम्यान फक्त 1 रन्स धावून काढली होती.

4 / 5
मोईन अलीने 6 व्या ओव्हरमध्ये राजस्थानचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या एका षटकात 5 चौकार ठोकले. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर पुढच्या 5 चेंडूंवर पाच चौकार मारले. त्याने या ओव्हरमध्ये 26 धावा लुटल्या.

5 / 5
मोईन अलीने CSK च्या इतिहासात दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. याआधी CSK साठी सुरेश रैनाने 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. CSK च्या इतिहासातील हे दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे.