टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणमध्ये DSP बनवण्यात आलय. डीएसपी बनल्यानंतर सिराजने पहिला कारनामा केलाय.
DSP बनल्यानंतर मोहम्मद सिराजचा पहिला कारनामा बंगळुरुमध्ये पहायला मिळाला.
मोहम्मद सिराजने हा कारनामा पोलिसाच्या वर्दीत नाही, तर क्रिकेटपटूच्या जर्सीत करुन दाखवलाय.
बंगळुरु टेस्टमध्ये भारतासाठी धोकादायक बनलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेलची जोडी तोडली.
मोहम्मद सिराजने डॅरिल मिचेलची विकेट घेऊन ही जोडी तोडली. DSP बनल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिचेल सिराजचा पहिला बळी ठरला.