ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक राणा अय्युब यांचे 1.77 कोटी रुपये जप्त केले आहेत. यूपी पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीत तक्रारदार विकास सांकृत्यायन यांनी आरोप केला होता की, राणा अय्युब यांनी केटोवर रिलीफच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जनतेचा पैसा कमावला होता.
राणा अय्युब यांनी कथितपणे 3 मोहिमांसाठी दिलेल्या देणग्या योग्य हेतूसाठी वापरल्या नाहीत. देणग्यांचा काही भाग कथितपणे वैयक्तिक खर्चासाठी वापरला गेला," असे ईडीचे अधिकारी सांगतात.
युपीत राणा अय्युब राणा यांच्याविरोधात एक तक्रार दाखल झाली होती, त्यामुळे तिथं त्यांची गेल्यावर्षापासून चौकशी सुरू होती.
केंद्रीय एजन्सीकडून राणा अय्युब यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, तक्रार त्यांनी गेल्यावर्षी युपी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.
ईडीने असा दावा केला आहे की अय्युबला एफसीआरए (फॉरेन कंट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट) अंतर्गत कोणत्याही मंजुरीशिवाय परदेशी देणग्या मिळाल्या, ही नियमावली परदेशातून निधी प्राप्त करण्यासाठी अनिवार्य आहे.
राणा अय्युब ही एक भारतीय पत्रकार आहे. तिने पूर्वी तहलका वृत्तपत्र समूहासाठी रिपोर्टर म्हणून काम केले होते, आणि आता ती स्वतंत्र स्तंभलेखक आहे.
नोव्हेंबर 2013 मध्ये राणा अय्युब यांनी तहलका राजीनामाचा राजीनामा दिला, त्यावेळी त्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता.